Home » Blog » NCP Sunetra Pawar: पवार माय-लेकरांची मोठी खेळी! एका निर्णयाने प्रफुल्ल पटेलांचे पंख छाटले; राष्ट्रवादीतील उलथापालथीत झालंय काय? | महाराष्ट्र बातम्या

NCP Sunetra Pawar: पवार माय-लेकरांची मोठी खेळी! एका निर्णयाने प्रफुल्ल पटेलांचे पंख छाटले; राष्ट्रवादीतील उलथापालथीत झालंय काय? | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:

Sunetra Pawar NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात एक मोठी आणि धक्कादायक घडामोडी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का दिला.

 पवार माय-लेकरांची मोठी खेळी! एका निर्णयाने प्रफुल्ल पटेलांचे पंख छाटले; राष्ट्रवादीतील उलथापालथीत झालंय काय?
पवार माय-लेकरांची मोठी खेळी! एका निर्णयाने प्रफुल्ल पटेलांचे पंख छाटले; राष्ट्रवादीतील उलथापालथीत झालंय काय?

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) अंतर्गत राजकारणात एक मोठी आणि धक्कादायक घडामोडी समोर आली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना मोठा धक्का देत, अजित पवार यांच्या कुटुंबीयांनी पक्षाच्या सर्व आर्थिक सूत्रांवर आपली पकड मजबूत केली आहे. २९ एप्रिल रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या यादीमुळे पक्षातील या मोठ्या फेरबदलावर शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या कार्यकारणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांना वगळण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती.

पवार कुटुंबाचा ‘पॉवर गेम’

निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच पार्थ पवार यांच्याकडे राष्ट्रीय महासचिव आणि जय पवार यांच्याकडे राष्ट्रीय सचिव तसेच खजिनदार ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे पक्षाचा संपूर्ण निधी, बँक व्यवहार आणि निर्णय प्रक्रिया आता सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार या तिघांच्या भोवतीच फिरणार आहे. विशेष म्हणजे, पक्षाच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारासाठी आता केवळ या तिघांपैकी एकाची स्वाक्षरी पुरेशी असणार आहे.

ज्येष्ठ नेत्यांना अंधारात ठेवल्याचा दावा

या नव्या नियुक्त्या करताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांसारख्या पक्षाच्या पायाभरणीत महत्त्वाचा वाटा असलेल्या ज्येष्ठ नेत्यांना पूर्णपणे अंधारात ठेवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यापूर्वी आर्थिक व्यवहारांचे अधिकार अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि वाय. पी. त्रिवेदी यांच्याकडे संयुक्तपणे होते. मात्र, नव्या यादीत पटेल आणि त्रिवेदी यांना स्थान न देऊन त्यांचे पंख छाटण्यात आले आहेत.

पक्षावरील नियंत्रणासाठी पावले…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतरही पक्षाच्या आर्थिक नाड्या प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच होत्या. ही सूत्रे जोपर्यंत पटेल यांच्याकडे राहतील, तोपर्यंत पक्षावर पूर्ण नियंत्रण मिळवता येणार नाही, हे ओळखून सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनी ही नवी यादी अत्यंत गोपनीय पद्धतीने तयार करून थेट निवडणूक आयोगाकडे पाठवली.

या संपूर्ण प्रकरणावर प्रफुल्ल पटेल यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या या नव्या ‘फॅमिली पॅक’ रचनेमुळे पक्षात येणाऱ्या काळात मोठ्या राजकीय हालचाली होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

NCP Sunetra Pawar: पवार माय-लेकरांची मोठी खेळी! एका निर्णयाने प्रफुल्ल पटेलांचे पंख छाटले; राष्ट्रवादीतील उलथापालथीत झालंय काय?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

VPN for iPhone

National