Home » Blog » Rohit Pawar: तटकरेंनी शरद पवारांची घेतली भेट अन् दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी फोडला बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ | महाराष्ट्र बातम्या

Rohit Pawar: तटकरेंनी शरद पवारांची घेतली भेट अन् दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी फोडला बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ | महाराष्ट्र बातम्या

Last Updated:

Rohit Pawar: तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.

तटकरेंनी शरद पवारांची घेतली भेट अन् दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी फोडला बॉम्ब, राजकीय वर्तुळात  खळबळ
तटकरेंनी शरद पवारांची घेतली भेट अन् दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी फोडला बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ

अभिजी पोते, प्रतिनिधी पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात सगळं काही आलबेल सुरू नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांचे पंख छाटण्यात येत असल्याच्या चर्चा सुरू असताना दुसरीकडे तटकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोठा खळबळजनक दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे २२ आमदारांना घेऊन आगामी विधानसभा निवडणूक भाजपच्याच चिन्हावर लढणार असल्याचा खळबळजनक दावा पवारांनी केला आहे. या विधानामुळे महायुतीमधील अंतर्गत संघर्षाची चर्चा आता चव्हाट्यावर आली आहे.

२२ आमदार भाजपच्या गळाला?

रोहित पवार म्हणाले की, “सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह २२ आमदार भाजपमध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहेत. इतकेच नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे काही आमदारही भाजपच्या संपर्कात असून ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.” विशेषतः मावळचे आमदार हे देखील भाजपमधूनच निवडणूक लढवतील, असा थेट दावा त्यांनी यावेळी केला. सध्या मावळमधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुनील शेळके आमदार आहेत.

मुख्यमंत्री फडणवीसांना खुलं आव्हान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना पवार म्हणाले, “फडणवीसांनी आता लेखी लिहून द्यावं की ते एकनाथ शिंदेंच्या किंवा राष्ट्रवादीच्या आमदारांना फोडणार नाहीत. याआधी त्यांनी अनेक आश्वासनं दिली, पण नंतर ‘आम्ही फोडलं नाही, तेच आमच्याकडे आले’ असं सांगून त्यांनी हात झटकले आहेत, असेही रोहित पवारांनी म्हटले.

खरात प्रकरणा आडून ब्लॅकमेलिंग…

खरात प्रकरणातील चौकशीत काहीही होणार नसल्याचा दावा रोहित पवाराांनी केला. या प्रकरणाच्या आडून भाजप इतर पक्षांच्या नेत्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोपही रोहित पवारांनी केला. एसआयटी चौकशी दाबण्यासाठी पैशांचे व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला. रक्ताने आंघोळ करणे किंवा बाहुलीला मारणे यांसारखे गंभीर प्रकार समोर का येत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “भाजपसोबत असलेल्या कोणाशीही आम्ही हातमिळवणी करणार नाही, पण त्यांना सोडून जे आमच्याकडे येतील, त्यांचा विचार केला जाईल,” असे संकेतही त्यांनी दिले.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Rohit Pawar: तटकरेंनी शरद पवारांची घेतली भेट अन् दुसऱ्या दिवशी रोहित पवारांनी फोडला बॉम्ब, राजकीय वर्तुळात खळबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Post

VPN for iPhone

National